Pankaja Munde : '... तर मी राजकारण सोडेल' असं का म्हणाल्या पंकजा मुंडे?

Pankaja Munde : '... तर मी राजकारण सोडेल' असं का म्हणाल्या पंकजा मुंडे?

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही उपस्थिती लावली.
Published by :
shweta walge
Published on

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही उपस्थिती लावली.

यावेळी दोन निवडणुकीत झालेला पराभव आणि विधान परिषदेत मिळालेलं घवघवीत यशाबाबत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, माझ्या उत्साहामध्ये फार फरक पडलेला नाही. राजकारणात आपल्या भूमिकांवर ठाम राहणं आणि असंख्य लोक आपल्याला पाहून प्रभावित होत असतात त्यांच्या भूमिका मांडत राहण हे फार महत्त्वाचा आहे आणि ते मी करत राहिले आहे. मी सभागृहात राहीले कींवा सभागृहाबाहेर राहीले तरी माझ्या उत्साहामध्ये फार फरक नाही. माझ्या लोकांच्या प्रती जे भावना आहेत ते पूर्ण करण्यामध्ये गती मिळेल.

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवामुळे एका तरुणाने केलेली आत्नहत्या, किंवा कार्यकर्त्यांसोबत असलेल्या नात्याबद्दल प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, माझ्या परभावानंतर जो प्रसंग घडला काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या तो विषय माझ्यासाठी फार दुःखाचा होता. इतकं प्रेम मी कुठे ठेवू त्याचा काय करू असा प्रश्न मला पडला होता. इतकं वाइट वाटलं मला. गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर कोणतीही अशी अप्रिय घटना नाही घडली.

मी कार्यकर्त्यांना म्हटले देखील की तुम्ही गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यु पचवू शकला पण माझा पराभव पचवू शकला नाही. मी त्यांना शेवटी म्हटले की मी राजकारण सोडेल जर तुम्ही हे सत्र थांबवले नाही तर.... यानंतर अशी कोणतीही अप्रिय घटना नाही घडली.

पुढे त्या म्हणाल्या की, समजाला पुढे नेण हे नेत्यांचं काम आहे. कार्यकर्त्यांना दम भरते कारण कार्यकर्त्यांना योग्य अयोग्य, चांगल आणि वाईट, काही सीमा दिल्या तर त्यांचंही जीवन घडत असतं. खुप लोक आहेत जे दहा वर्षापूर्वी माझ्या जीवनात आले आणि त्यांना मी काही गोष्टी सांगितल्या त्या प्रमाणे ते राहीले. तर ते लोक आता म्हणतात की, ताई तुम्ही जे सांगितलं होतं ते चांगल आहे.

मला असं वाटतं की मी एक ताई, आई आहे, कार्यकर्त्यांकडे सुद्धा मी तशाच दृष्टीने पाहते. समाज घडवण हे देखील एक काम आहे. नुसतच आपण नेतृत्व करण पदावर विराजमान होण एवढंच आम्हचं काम नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com