Maharashtra Budget : विधान परिषदेत कोण मांडणार बजेट? मिळाले उत्तर तिढा सुटला
शिंदे-फडणवीस सरकार आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर हा पहिला अर्थसंकल्प आहे.
कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद, शेतकऱ्यांसाठी पॅकेज पायाभूत सुविधा, शहरी भागांसाठी विविध प्रकल्प, आदीबाबतच्या मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.राज्यावर कर्जाच्या व्याजाचा बोजा 46 हजार कोटी रुपये आहे.2022-23 मध्ये राज्यावर 6 लाख 49 हजार 699 कोटी कर्ज अपेक्षित आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचं अर्थसंकल्प हे विधान परिषदेत नेमकं कोण मांडणार असा प्रश्न निर्माण झाला होता. पत्रकार परिषदेत बोलताना यावर निर्णय होईल, असं वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
मात्र आता त्याचा तिढा सुटणार आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याच्या आधी 2014 ते 2019 या काळात त्यांनी वित्तमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला होता.