कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? आज होणार फैसला
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत काँग्रेसने 224 जागांपैकी 136 जागांवर विजय मिळवत कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. तर दुसरीकडे भाजपचा या निवडणुकीत दारूण पराभव झालाय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात या विजयाचा काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येतोय. तर यावर विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? कर्नाटकचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या या दोघांची नावं सध्या चर्चेत आहेत.
आज कर्नाटच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीतून जाहीर होण्याची शक्यात आहे. आज दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची शिवकुमार आणि सिद्धरमैय्यांबरोबर बैठक होणार आहे. त्यानंतरच सायंकाळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईल. अशी माहिती मिळत आहे.