काँग्रेसमधील सर्वात खराब अध्यक्ष कोण? गुलाम नबी आझाद यांनी सांगूनच टाकले...
माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या 'आझाद" या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे. त्याच्याच पार्श्वभूमीवर एका वृत्तसंथ्येला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसविषयी काही मोठ्या गोष्टी उघड केल्या आहेत. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत.
'काँग्रेसमधील सर्वात खराब अध्यक्ष कोण? यावर सुद्धा त्यांनी सविस्तर लिखाण केले आहे. राहुल गांधी यांनी काम करण्याची पद्धतीवर नाराज असल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे पत्र आझाद यांनी सोनिया गांधींनी लिहिले होते.
१९९६ च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, त्यांची चर्चा काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत झाली. त्यावेळी त्यांनी पीव्ही नरसिंहराव यांच्याबद्दल सांगितले होते की, की ते चांगले पंतप्रधान आहेत, पण पक्षासाठी ते चांगले अध्यक्ष नाहीत. पक्षाच्या संघटन कौशल्यासाठी नरसिंहराव यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. असे गुलाम नबी आझाद यांनी त्यात लिहिले आहे.