Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा हायवेचे काम रखडण्याला जबाबदार कोण? उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई-गोवा हायवेचं काम रखडल्याचं खापर कंत्राटदारांवर फोडण्यात आलं आहे. पळपुट्या कंत्राटदारांमुळं हायवेचं काम रखडलं असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. हायवे रखडण्याला आतापर्यंतची सगळी सरकारं जबाबदार आहेत असं देखीस उदय सामंत म्हणालेत.
सरकार आलं असं म्हणण्यापेक्षा सरकार अनेकवेळा आलेलं होतं. मला असं वाटतं की मुंबई - गोवा महामार्ग कामाची सुरुवात 2012ला झाली. ज्याप्रकारे कंत्राटदार त्या संपूर्ण प्रकल्पामध्ये होते त्या कंत्राटदारानी पळपुटी भूमिका घेतली म्हणून हा प्रकल्प मागे राहिला आहे आणि याच्यामध्ये एकच सरकार जबाबदार असू शकत नाही.
नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर ही संकल्पना निघून गेली आणि केंद्र सरकारच्या 100 टक्के पैशातून करण्याचा हा निर्णय झाला. हे योगदान नक्कीच मोदी सरकरचं आहे आणि निवडणूका आल्यामुळे कदाचित पवार साहेबांना काही इथल्या लोकांनी ब्रिफ केल्यामुळे असल्या पद्धतीचा त्यांचा गैरसमज झाला असेल. परंतू मुंबई - गोवा महामार्ग हा पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतलेली आहे आणि या डिसेंबरपर्यंत हा रस्ता पूर्ण होणार आहे असे उदय सामंत म्हणाले.