नॅनो कार बाजारात आणण्यामागचा रतन टाटा यांचा विचार काय होता? जाणून घ्या

नॅनो कार बाजारात आणण्यामागचा रतन टाटा यांचा विचार काय होता? जाणून घ्या

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. टाटा समूहाकडून निधनाची बातमी देण्यात आली. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे.

यावेळी रतन टाटा यांचे अनेक किस्से लक्षात येतात. त्यापैकी एक म्हणजे नॅनो कारची कल्पना रतन टाटा यांनी कशी सुचली.

नोव्हेंबर 2003 मध्ये रतन टाटा प्रवास करत होते. तेव्हा त्यांनी स्कूटरवर जाणाऱ्या एका कुटुंबाला पाहिलं. त्यावेळी जोरदार पाऊस पडत होता आणि एका कुटुंबातील चारजण एकाच स्कूटरवरून जात होते. याचवेळी रतन टाटा यांनी सुचलं की सामान्य माणसासाठी काही करायचं.

ही कल्पना सुचल्यानंतर टाटा ग्रुपने नॅनो कार लॉन्च केली. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी ही कार त्यांनी बाजारात आणली. त्यावेळी नॅनो कारची चांगलीच चर्चा रंगली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com