डिजिटल रेप म्हणजे नेमके काय?

डिजिटल रेप म्हणजे नेमके काय?

डिजिटल रेप गुन्ह्यांची व्याप्ती बलात्कार मानली जाते.
Published by :
Team Lokshahi
Published on

डिजिटल रेप (Digital Rape)हा शब्द आणि हा गुन्हा बऱ्याच जणांना कळला नसेल. उत्तर ओरदेशातील नोएडा मध्ये मॉरिस रायडर नावाच्या एका ८१ वर्षाच्या स्केच आर्टिस्टला पोलिसांनी (Police)अटक केली आहे. त्याच्यावर एका १७ वर्षांच्या मुलीवर सात वर्षे डिजिटल रेप (Digital Rape)केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. आता डिजिटल रेप म्हणजे नेमकं काय ते आपण पाहूया.

डिजिटल रेप म्हणजे नेमके काय?
राज यांचा अयोध्या दौरा स्थगित, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे म्हणाले...

कुठल्याही स्त्री किंवा महिलेसोबत बळजबरीने संभोग करताना बोटे, अंगठा किंवा प्रजनन अवयवाव्यतिरिक्त कोणत्याही इतर वस्तूचा वापर केला जातो यालाच डिजिटल रेप असे म्हणतात. 'डिजिटल' या शब्दाचा अर्थ होतो संख्या त्याचबरोबर शरीराचे काही अवयव म्हणजे बोटे , अंगठा पायाचे अंगठे यांसारख्या अवयवांना देखील 'डिजिट' असे संबोधले जाते. दिल्लीमध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर या डिजिटल बलात्काराच्या शिक्षेचीही कठोर तरतूद करण्यात आलेली आहे. महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले गेले. 'डिजिटल रेप' डिसेंबर २०१२ पर्यंत बलात्काराच्या कक्षेत येत नव्हते. निर्भया सामूहिक बलात्कारानंतर भारतातील लैंगिक गुन्ह्याला ‘डिजिटल रेप’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले. ज्यामुळे देशातील गुन्हेगारी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या. आता डिजिटल रेप गुन्ह्यांची व्याप्ती बलात्कार मानली जाते.

डिजिटल रेप म्हणजे नेमके काय?
'मन उडू उडू झालं' फेम ह्रता दुर्गुळे अडकली लग्नबंधनात...

नोएडा मध्ये नेमके काय घडले ?

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आई वडील आरोपीला मागील वीस वर्षांपासून ओळखत होते. मुलगी अल्पवयीन असल्याने आणि मनात भीती असल्याने सुरुवातीला फिर्याद नोंदविता आली नव्हती पण नंतर पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि मोठ्या प्रमाणात या संदर्भातील पुरावे पोलिसांच्या हाती लागले. यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. याप्रकरणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी ८१ वर्षाच्या मॉरिस रायडरला बेड्या ठोकल्या. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३२३ आणि ५०६ अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्टर ३९ चे एसएचओ राजीव कुमार यांनी पीटीआयला सांगितले, “मुलगी येथे तिच्या पालकासोबत राहते. मुलीचे पालक २० वर्षांपासून आरोपीला ओळखतात. याप्रकरणी पालकांनी तक्रार दाखल केली होती. अटकेनंतर आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.”

डिजिटल रेप म्हणजे नेमके काय?
Photo : इंडियन आयडॉल फेम सायली कांबळे अडकली विवाहबंधनात

डिजिटल रेपसाठी शिक्षेची तरतूद काय आहे ?

भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ नुसार, डिजिटल रेप प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, शिक्षा १० वर्षे किंवा जन्मठेपेची असू शकते

यापूर्वी घडलेले डिजिटल रेपचे गुन्हे

दोन वर्षांच्या मुलीवर डिजिटल रेप : मुंबईतील एका रुग्णालयात एका दोन वर्षाच्या मुलीला ऍडमिट करण्यात आले होते डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर त्या मुलीच्या योनीमार्गात बोटांचे ठसे आढळून आले. पण लैंगिक छळ किंवा बलात्काराचे कुठलेही संकेत या काळात मिळाले नाहीत. पण तपासात आलेल्या धक्कादायक माहितीमध्ये असे आढळून आले कि या दोन वर्षांच्या मुलीचे वडीलच असे कृत्य करत होते. त्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली, परंतु बलात्काराशी संबंधित असलेल्या भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत शिक्षा किंवा आरोप लावण्यात आला नाही.

वृद्ध महिलेवर डिजिटल रेप

दिल्लीत एका ६० वर्षीय महिलेवर एका ऑटोरिक्षा चालकाने डिजिटल बलात्कार केल्याची घटना घडली होती. ६० वर्षीय महिला एका नातेवाईकाच्या घरी ऑटोमधून लग्न समारंभासाठी जात होती. यादरम्यान ऑटोचालकाने महिलेच्या योनीमध्ये लोखंडी रॉड घातला होता. या प्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आली. पण त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले नाही.

डिजिटल रेप म्हणजे नेमके काय?
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, काय आहे कारण?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com