राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2022 ने काय दिलं आणि 2023 कडून काय अपेक्षा, पाहा काय सांगितले?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2022 ने काय दिलं आणि 2023 कडून काय अपेक्षा, पाहा काय सांगितले?

आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे. नववर्षाच्या स्वागतापूर्वी चालू वर्षाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नववर्षाच्या स्वागताचे सर्वांना वेध लागले आहे. कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर मुंबईकर नववर्षाचे जोरदार आणि जल्लोषात साजरा करणार आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2022 ने काय दिलं आणि 2023 कडून काय अपेक्षा आहेत हे सांगितले आहे. शरद पवार म्हणाले की, 56 ते 60 टक्के लोक शेती करत आहेत. पाऊस चांगला झाला तर येणारं वर्ष चांगलं जाईल. शेती चांगली झाली तर क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती वाढणं हे व्यापार उद्योगाला चांगले दिवस आणतं. बळीराजा यशस्वी झाला तर संबंध देशातील अन्य घटकांचेही दिवस चांगले येतात.

सुदैवाने मागील वर्ष ठीक गेलं.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारत महत्वाचा निर्यातदार होऊ शकतो. उद्योग आणि व्यापार क्षेत्रात सुधारणा व्हायला हव्यात. सत्तेत कोणीही असलं तरी एकत्रित राहून अर्थकारण सुधारावं लागेल असे ते म्हणाले.

यासोबतच आजची तारीख 31 डिसेंबर. बरंच काही सांगून जाते… मागच्या वर्षभरात काही प्रश्न काही चांगल्या गोष्टी घडल्या… जे प्रश्न होते त्याला पर्याय शोधून सामना करण्याची आवश्यकता होती ती केली… आता आपण यातून मुक्त झालो. आता 2023 वर्ष सुरु होईल.. अवघा भारत देश औत्सुक्याने नव्या वर्षाची पाहतोय. येतं वर्ष नव्या आशा-आकांक्षांचं असेल. असे शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2022 ने काय दिलं आणि 2023 कडून काय अपेक्षा, पाहा काय सांगितले?
‘…हे सगळे कलंक मावळत्या वर्षातलेच; शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com