पश्चिम बंगालच्या रेल्वेचा भीषण अपघात; कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची जोरदार धडक

पश्चिम बंगालच्या रेल्वेचा भीषण अपघात; कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची जोरदार धडक

पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वेचा अपघात झाला आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वेचा अपघात झाला आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. या अपघातात दोन डबे रुळावरून घसरले आहेत. ट्रेन सियालदहला जात होती. एका मालगाडीने थांबलेल्या ट्रेनला मागून धडक दिली. ट्रेनच्या तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर दोन बोगी एकमेकांवर चढल्या आहेत.

रंगपाणी ते निजबारी दरम्यान हा अपघात झाला. दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी मृत्यूची अधिकृत पुष्टी झालेली नाही. जखमींबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. बचाव कार्यासाठी आपत्ती पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलं की, दार्जिलिंग जिल्ह्यातील फांसीदेवा भागात घडलेल्या एका भीषण रेल्वे अपघाताविषयी जाणून घेऊन धक्का बसला. तपशीलांची प्रतीक्षा असताना, कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिल्याचे वृत्त आहे. बचाव, पुनर्प्राप्ती, वैद्यकीय मदतीसाठी डीएम, एसपी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. युद्धपातळीवर कारवाई सुरू केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com