पश्चिम बंगालच्या आमदाराचे राम मंदिराबद्दल वादग्रस्त विधान; म्हणाले...
राम मंदिराबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राम मंदिराला अपवित्र स्थान म्हटलं आहे. बंगालचे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार रामेंदू सिन्हा राय यांनी अयोध्येत नव्याने बांधण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिराबाबत वादग्रस्त विधान केले आहे. इतकेच नाही तर कोणत्याही भारतीय हिंदूने अशा अपवित्र ठिकाणी पूजा करू नये, असेही ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. रामेंदु सिन्हा यांच्या वक्तव्याचा चहूबाजूंनी निषेध होत आहे.
व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, ‘मंदिर बांधले गेले आहे आणि कोणत्याही हिंदूने राम मंदिरात पूजा करण्यासाठी जाऊ नये.’ टीएमसी नेत्याने पुढे म्हटले आहे की, ‘जर पंतप्रधान मोदी ब्राह्मण नाहीत तर ते प्राणप्रतिष्ठा कसे करू शकतात?’ यावर भाजपाने पलटवार केला आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
या वादग्रस्त वक्तव्यावर तृणमूलवर हल्लाबोल करताना सुवेंदू म्हणाले की, हे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे सत्य आहे. हिंदूंवर हल्ले करताना त्यांची हिंमत एवढी वाढली आहे की, त्यांना आता भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिराला 'अपवित्र' म्हणण्याची हिंमत येत आहे. त्यांच्या या वर्णनावरून तृणमूल नेतृत्वाची भगवान श्री राम यांच्याबद्दलची भावना प्रकट होते. रामेंदू सिन्हा राय हे आरामबाग संघटनात्मक जिल्ह्याचे तृणमूल अध्यक्ष देखील आहेत.