ताज्या बातम्या
'या' दिवशी पडणार महाराष्ट्रात पाऊस
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी राज्यातील पावसाबाबत माहिती दिली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी राज्यातील पावसाबाबत माहिती दिली आहे. मान्सून साधारणपणे 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होतो.
केरळमध्ये मान्सून उशिराने दाखल झाला. आता मात्र प्रतिक्षा आहे ती राज्यात पाऊस कधी पडणार. हवामान विभागानुसार, मान्सून १८ जूनपर्यंत दक्षिणेतून महाराष्ट्रात दाखल होईल. अशी माहिती मिळत आहे.
मान्सून १८ जूनदरम्यान मुंबईसह तळकोकणात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता केरळमध्ये पाऊस उशिरा आल्याने राज्यातील पाऊसही लांबला आहे.