ताज्या बातम्या
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, आज-उद्या 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार
मुंबईत आज- उद्या पाणीकपात असणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतील काही ठिकाणचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे.
मुंबई : मुंबईत आज 29 आणि उद्या 30 नोव्हेंबरला पाणीकपात असणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतील काही ठिकाणचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे. मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये आज 29 नोव्हेंबर सकाळी 8.30 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 8.30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे.
मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा वाढवण्यासाठी आणि पाणीपुरवठ्याचे जाळे आणखी मजबूत करण्यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने वेरावली ते घाटकोपर दरम्यान, 6.6 किलोमीटरचा बोगदा बांधला जात आहे.
या विभागांतील काही भागांत पुरवठा बंद
अंधेरी के/पूर्व, अंधेरी के/पश्चिम, गोरेगाव पी/दक्षिण, वांद्रे एच/पूर्व, एच/पश्चिम, भांडुप एस, घाटकोपर एन आणि कुर्ला एल.
या विभागांतील काही भागांत कमी दाबाने पुरवठा
अंधेरी के/पूर्व, दादर जी/उत्तर, गोरेगाव पी/दक्षिण, वांद्रे एच/पश्चिम.