मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; आज, उद्या 5 ते 10 टक्के पाणीकपात

मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; आज, उद्या 5 ते 10 टक्के पाणीकपात

मुंबई शहरात आज, उद्या पाणीकपात करण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबई शहरात आज, उद्या पाणीकपात करण्यात येणार आहे. वैतरणा जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आज, उद्या 5 ते 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये 5 ते 10 टक्के इतकी घट झाली असून वैतरणा जलवाहिनीच्या झडपेमध्ये बिघाड झाला आहे.

या बिघाडाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून आज आणि उद्या दोन दिवस मुंबईत पाणीकपात करण्यात येणार असून मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com