मनी हाईस्ट वेबसिरिज बघितली आणि बँक कर्मचाऱ्यानेच घातला स्वतःच्याच बँकेत दरोडा

मनी हाईस्ट वेबसिरिज बघितली आणि बँक कर्मचाऱ्यानेच घातला स्वतःच्याच बँकेत दरोडा

डोंबिवलीमधील एमआयडीसी भागात असलेल्या आयसीआयसीआय या बॅंकेच्या तिजोरीतून १२ कोटी रुपये लांबवल्याचा प्रकार काही महिन्यापूर्वी समोर आला होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमजद खान, डोंबिवली

डोंबिवलीमधील एमआयडीसी भागात असलेल्या आयसीआयसीआय या बॅंकेच्या तिजोरीतून १२ कोटी रुपये लांबवल्याचा प्रकार काही महिन्यापूर्वी समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांनी कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. अखेर या टोळीचा मुख्य सूत्रधार बँक कस्टीडियन अल्ताफ शेख सह त्याची बहीण निलोफर हिला अटक करण्यात मानपाडा पोलिसाना यश आले आहे

जुलै महिन्यात डोंबिवली एमआयडीसी परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेतून बारा कोटींची रक्कम चोरी झाल्याची घटना उघड झाली होती. एका प्रसिद्ध बँकेतून इतकी मोठी रोकड चोरी झाल्याने एकच खलबळ उडाली होती याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी ठाणे क्राइम ब्रांचने काही आरोपी अटक केली होती. आता या प्रकरणात या बँकेत चोरी करणारी चोरीचा मुख्य सूत्रधार बँकेच्या कस्टो डियान अल्ताफ शेखला अटक करण्यात आली आहे .

मानपाडा पोलिसांनी अल्ताफ शेख आणि तिची बहीण निलोफर हिला अटक केली आहे. अल्ताफ शेख त्यांनी वेब सिरीज पाहून हा सर्व कट रचला होता .त्याने तिच्या बहिणीच्या नावावर काही घर घेतली होती म्हणून याप्रकरणी निलोफर शेख हिला देखील आरोपी केले आहे. आतापर्यंत पोलिसांनी चोरीस गेलेल्या जवळपास नऊ कोटी हस्तगत केले आहे पुढील तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com