Riyan Parag
Riyan Parag

टी-२० वर्ल्डकपमध्ये रियान परागची होणार निवड? माजी क्रिकेटपटूनं स्पष्टच सांगितलं; म्हणाला, "टीम इंडियात..."

"रियान पराग या आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. एक युवा खेळाडू अशाप्रकारे फलंदाजी करत आहे, हे पाहून खूप चांगलं वाटत आहे"
Published by :
Naresh Shende
Published on

राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू रियान परागने धडाकेबाज फलंदाजी करुन यंदाच्या आयपीएल हंगामात धावांचा पाऊस पाडला आहे. रियानने आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीचं संपूर्ण क्रिडाविश्वातून कौतुक होत आहे. अशातच माजी क्रिकेटर वसीम जाफरने रियानबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रियान परागने आयपीएल २०२४ मध्ये चमकदार कामगिरी केलीय, त्यामुळे तो टी-२० वर्ल्डकपसाठी प्रबळ दावेदार आहे, टीम इंडियात परागची निवड झाल्यास कुणालाही शंका उपस्थित करण्याची आवश्यकता नसेल, असं जाफरने म्हटलं आहे.

रियान परागने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने धडाकेबाज फलंदाजी करून राजस्थान रॉयल्सला सामने जिंकवून दिले आहेत. रियानने ५ सामन्यांमध्ये २६१ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ८४ धावा हा रियान परागचा सर्वाधिक स्कोअर आहे.

वसीम जाफरने माध्यमांशी बोलताना म्हटलं, रियान पराग या आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहे. एक युवा खेळाडू अशाप्रकारे फलंदाजी करत आहे, हे पाहून खूप चांगलं वाटत आहे. परागने आसामसाठी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलीय. चार नंबर त्याच्यासाठी योग्य आहे. कारण या क्रमांकावर सेट व्हायला त्याला थोडा वेळ मिळतो. त्याने किती मेहनत घेतली आहे, हे त्याच्या खेळातून दिसत आहे. त्याचं शॉट सिलेक्शनही खूप जबरदस्त आहे. त्याने फिनिशरचा रोलही केला आहे. तो खूप चांगल्या माईंडसेटमध्ये आहे, असं मला वाटतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com