MLA Ravi Rana
MLA Ravi RanaTeam Lokshahi

आमदार रवी राणा पुन्हा तुरुंगात जाणार? जामीनपात्र वॉरंट जारी

महापालिका आयुक्तांवर शाईफेक प्रकरणात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

मुंबई : अमरावतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात एका प्रकरणात आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांवर शाईफेक केली होती. यावेळी रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच प्रकरणात आता अमरावती न्यायालयाकडून रवी राणा यांच्याविरोधात जामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं आहे. रवी राणा यांच्या खार येथील घरी पोलीस हे वॉरंट देण्यासाठी पोहोचले होते. मात्र रवी राणा त्याठिकाणी उपस्थित नव्हते.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून 6 तर भाजपकडून 5 उमेदवार रिंगणात आहेत. विधान परिषदेच्या 20 तारखेला 10 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत पुन्हा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप सामना रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर कारवाई होत असल्याचं देखील बोललं जातंय. त्यामुळे आता नेमकी रवी राणांवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com