'या' जुन्या प्रकरणाने राज ठाकरे अडचणीत!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अडचणींमध्ये आज अचानक वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे एका जुन्या प्रकरणामुळे राज यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सांगलीच्या शिराळा कोर्टाचे राज ठाकरेंविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. ठाकरे यांनी काही वादग्रस्त विधानं केल्याचाही आरोप झाला. यावेळी सांगलीच्या शिराळ्यात मनसेच्या कार्यतर्त्यांनीही आंदोलन केलं होतं. या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई झाली होती. या प्रकरणात राज ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख होता.
महिनाभरापूर्वी शिराळा कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. मात्र महिनाभरापासून पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पाच ते दहा वर्षांपूर्वीच्या केसेस निकाली काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आहेत. त्यानुसार ही प्रकऱणं आतापर्यंत मार्गी लागणं आवश्यक होतं. मात्र, अद्याप कारवाई न झाल्याने कोर्टाकडून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं. त्याआधीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil ) यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.