wardha: वर्धा जिल्ह्यातील तळेगावात 300 खाटांच्या रुग्णालयाकरीता जागा मंजूर
युवानेता सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश
भूपेश बारंगे,वर्धा : वर्धा जिल्ह्यात सर्वात प्रथम आर्वी तालुक्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, त्यावरून दोन मतदार संघातच ओढाताण सुरू झाली होती. आष्टी तळेगाव दरम्यान, 6 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने तळेगाव (श्या.पंत) लगतच्या मौजा काकडदरा येथे 300 खाटांच्या सामान्य रुग्णालयाकरीता जागा देण्यात आली असल्याचे पत्र तहसीलदार आष्टी यांना दिल्याने भाजपाचे युवा नेते सुमीत वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तळेगाव येथे 300 खाटाच रुग्णालयाच्या जागेची मंजूर मिळाली असून कामाला गती येणार आहे. यामुळे सुमित वानखेडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्य सरकारने वैद्यकीय महाविद्यालय वर्धा जिल्ह्यात जाहीर केल्यानंतर आर्वी आणि हिंगणघाट या दोन मतदार संघात चढाओढ लागली होती. दरम्यान, हिंगणघाट येथे जागेचा प्रश्न उपस्थित झाल्याने हिंगणघाट येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मागे पडत जात असतानाच 6 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकार्यांनी काढलेल्या पत्रात मौजा काकडदरा येथील शासकीय स.नं. 43/1 आराजी 47.07 हेक्टर आर मधील 10 हे. आर. (25 एकर) शासकीय जागा 300 खाटांचे सामान्य रुग्णालयाकरीता जिल्हा शल्य चिकित्सक यांना जागा मंजूर करण्यात येत असल्याचे नमुद केले आहे.
या संदर्भात युवानेता सुमित वानखेडे यांच्यासोबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, आर्वी मतदार संघात आरोग्य सेवा अजून तंदूरुस्त व्हावी यासाठी आपले प्रयत्न सुरू होते. वर्धा, अमरावती आणि नागपूर या तीन जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण तळेगाव येते. त्यामुळे येथेच सामान्य रुग्णालय व्हावे असा आपला आग्रह होता. सामान्य रुग्णालयाकरीता जागा मिळाल्याने एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता शासनाने निधी मंजूर केला की कामाला सुरूवात होईल, असे वानखेडे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आपल्या मतदार संघासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत, असेही वानखेडे यांनी सांगितले.
सुमित वानखेडे,भाजप लोकसभा प्रमुख वर्धा