शेतकऱ्याचा नादच खुळा; साहेब इंग्रजीत सांगू की मराठीत, अशी दिली अतिवृष्टी नुकसानीची माहिती
भूपेश बारंगे, वर्धा
वर्ध्यात अतिवृष्टी पावसामुळे घरासह शेतपिकांचे मोठं नुकसान झालेय. याकरिता पाहणीला केंद्रीय पथक आले असता त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात सवांद साधला यावेळी चक्क शेतकऱ्याने त्यांच्याशी इंग्रजीत संवाद साधला यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या त्यानंतर हिंदीत नंतर मराठीत सवांद साधला. यावेळी शेतकऱ्याने चक्क इंग्रजीत केंद्रीय पथकाशी सवांद साधला त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. साहेब इंग्रजीत समजले की मराठीत सांगू ही डॉयलॉग सैराट पिक्चर मधली आठवली. यामुळे शेतकऱ्याचा नादच खुळा. असं बोलले जात आहे.
नदीला पूर कसा आला, पाणी शेतात कसे घुसले याबद्दल ते मोडक्या-तोडक्या इंग्रजीत सांगायला लागले. एक अधिकारी चुळबूळ करायला लागल्यावर मग त्यांनी ‘ट्रॅक’ बदलत हिंदीचा आधार घेतला. दोन-चार वाक्य झाल्यावर मग त्यांना मायमराठीचा आधार घ्यावा लागला.
यशोदा नदीचे बॅक वॉटर अनेकांच्या शेतात शिरले. काहींच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठी नासाडी झाली. अंकुरलेले पिके पाण्याखाली आली, तर काही ठिकाणी पिके वाहून गेली. १९९४ मध्ये पूरस्थितीचे संकट ओढावले होते; तेव्हाच्या संकटापेक्षा यंदा मोठे नुकसान झाले आहे. शेतातील विदारक परिस्थिती पाहून चक्करच येते हो साहेब. तुम्ही तरी आपल्या अहवालात नुकसानीची वास्तव स्थिती मांडा, असे निमसडकर यांनी अधिकाऱ्यांना घातले.