वर्धा जिल्ह्यातील कारंजात चार दुकाने जळून खाक; 20 लाखांचे नुकसान
भूपेश बारंगे, वर्धा :
वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे आज पहाटेच्या सुमारास चार दुकानाला आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. या आगीत जवळपास 10 ते 20 लाखाचे नुकसान झाले आहेय. शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण जागेवर वसलेले दुकानात अचानक आग लागली. दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने यांचे दहा लाखापेक्षा नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या आगीमध्ये मोठं नुकसान झाले आहे. दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. याठिकाणी पान टपरी, पेढ्याचा दुकान, पत्रावळीचे दुकानाचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र कळू शकले नाही. पहाटेपासून लागलेल्या आगीत सकाळी साडे आठ वाजेपर्यंत आग विझवण्याच्या प्रयत्न सुरू आहे. यावरून आगीचे रौद्ररूप लक्षात येते. चार दुकानात आग लागल्याचे समजताच नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. यावेळी अनेक नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरू आहे. घटनास्थळी कारंजा पोलीस दाखल झाले आहे.