सातारा जिल्ह्यात 259 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

सातारा जिल्ह्यात 259 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

सातारा जिल्ह्यात 259 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

प्रशांत जगताप, सातारा

सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून यामध्ये 47 पूर्णतः आणि 13 अंशतः अशा एकूण 60 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण 259 ग्रामपंचायतींच्या 927 मतदान केंद्रांवर आज मतदान होत आहे.. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान आज होत आहे. सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त सर्व मतदान अधिकारी आणि कर्मचारी मतदान साहित्यासह पोलीस बंदीबस्तात पोचले आहेत.

259 ग्रामपंचायतींच्या 927 मतदान केंद्रांवर मतदान होणार असल्याने सातारा तालुक्यात 29, कराड 33 ,पाटण 71,कोरेगाव 43, माण 28 ,फलटण 20, खटाव 12 ,महाबळेश्वर 3, जावली 11, वाई 7, खंडाळा 2 एकूण 269 गावामध्ये आज मतदान होत आहे. यासाठी महिला मतदारांची संख्या 2 लाख 15 हजार 673 तर पुरुष मतदारांची संख्या 2 लाख 27 हजार 805 आहे. एकूण पुरुष आणि महिला यांची एकूण संख्या 4 लाख 43 हजार 481 एवढी आहे

जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायत गटामध्ये होणारी लढत पुढीलप्रमाणे..

सातारा :-छत्रपती उदयनराजे भोसले गट विरुद्ध छत्रपती शिवेंद्रराजे भोसले गट

कराड:- काँग्रेस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गट विरुद्ध अतुल भोसले भाजपा

पाटण:-मंत्री शंभूराज देसाई (शिंदे गट शिवसेना) विरुद्ध राष्ट्रवादी सत्यजित पाटणकर गट

कोरेगाव:-शिंदे गट शिवसेना आमदार महेश शिंदे गट आणि छत्रपती उदयनराजे भोसले गट विरुद्ध राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे गट आणि भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले गट

फलटण:- सभापती राष्ट्रवादी रामराजे नाईक निंबाळकर गट विरुद्ध भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गट

माण,खटाव:- प्रभाकर देशमुख राष्ट्रवादी गट विरुद्ध भाजप आमदार जयकुमार गोरे गट

वाई-खंडाळा:- राष्ट्रवादी आमदार मकरंद पाटील गट विरुद्ध मदन भोसले भाजपा गट

जावली:-भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले गट विरुद्ध राष्ट्रवादी आ. शशिकांत शिंदे, दीपक पवार गट

मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न होण्यासाठी मतदान केंद्रालगत भरणारे आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय सर्व तहसीलदार यांनी जारी केलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com