विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान; दिपक केसरकर म्हणाले...

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान; दिपक केसरकर म्हणाले...

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होणार असून संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणी होणार आहे. क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून विशेष खबरदारी घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

विधान परिषदेत महायुती की महाविकास आघाडी कोणाला पराभव स्विकारावा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. हरणारा 12वा उमेदवार कोण असणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

याच पार्श्वभूमीवर दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिपक केसरकर म्हणाले की, आमच्याच पक्षाची जी मतं आहेत तीच एकमत जास्त आहे आमच्याकडे आमचे अपक्ष आणि आमदार मिळून खरंतर आमच्याकडे चार मत जास्त होती. परंतु आमचे एक खासदार निवडून आलं. आमचे दोन्ही सदस्य निवडून येतील आणि महायुतीचे सर्व सदस्य निवडून येतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com