गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर हे मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात आज 14 जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा घाटलोडिया, भाजप नेते हार्दिक पटेल यांचा विरमगाम तसेच गांधीनगर दक्षिणचा समावेश असून जिथून भाजपचे अल्पेश ठाकोर निवडणूक लढवत आहेत. जिग्नेश मेवाणी हे बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

93 विधानसभा मतदारसंघांमध्ये 2.54 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. 26,409 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून सुमारे 36,000 ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. दोन टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. भाजप सर्व 93 जागांवर निवडणूक लढवत आहे. शिवाय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप सर्व 93 जागांवर लढत आहेत. काँग्रेस 90 जागांवर निवडणूक लढवत असून त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भारतीय आदिवासी पक्षाने (BTP) 12 उमेदवार उभे केले आहेत आणि बहुजन समाज पक्षाने (BSP) 44 उमेदवार उभे केले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com