रशियाची लोकसंख्या वाढेना; राष्ट्राध्यक्ष पुतिन चिंतेत
थोडक्यात
रशियाला घटत्या जन्मदराचा सामना करत असून, देशाची लोकसंख्या कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आव्हाने निर्माण होऊ शकतात.
राष्ट्राध्यक्ष पुतिन लोकसंख्या वाढवण्यासाठी विविध धोरणे आखण्याच्या तयारीत आहेत, ज्यात मातृत्व भत्ते, करसूचना आणि घर खरेदीसाठी अनुदान यांचा समावेश आहे.
रशियातील तरुण नागरिक अधिकाधिक परदेशी स्थलांतर करत आहेत, विशेषत: उच्च शिक्षण आणि कामाच्या संधींसाठी, ज्यामुळे देशातील कामकाजी लोकसंख्या घटू शकते.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश असलेल्या रशियाला घटत्या जन्मदराचा सामना करावा लागत आहे. रशियाची लोकसंख्या वाढत नसल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भयंकर चिंतेत सापडले आहेत. या समस्येची गांभीर्याने दखल घेत देशाच्या लोकसंख्या वाढीसाठी विविध धोरणे आखण्याची तयारी करत आहेत.
रशिया देशातील घटत्या जन्मदराला तोंड देण्यासाठी 'मिनिस्ट्री ऑफ सेक्स' तयार करण्याचा विचार करत आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या रशियन संसदेच्या कौटुंबिक संरक्षण, पितृत्व, मातृत्व आणि बाल्य समितीच्या अध्यक्षा नीना ओस्टानिना यांनी अशा मंत्रालयाची मागणी करणाऱ्या याचिकेचे पुनरावलोकन केले आहे.
युक्रेनमधील युद्धामुळे देशाची लोकसंख्या कमी होऊ लागली. जवळपास तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धात रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांची मोठी जीवितहानी झाली आहे. लोकसंख्या वाढीचा घटता दर रोखण्यासाठी पुतीन यांनी लोकसंख्या वाढवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी रशियन अधिकारी अनेक धोरणांचा अवलंब करत आहेत.