विवेक फणसाळकर यांंच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार; कोण आहेत विवेक फणसाळकर?

विवेक फणसाळकर यांंच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार; कोण आहेत विवेक फणसाळकर?

विवेक फणसाळकर यांना महाराष्ट्र डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या फणसाळकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात यशस्वी कामगिरी बजावली आहे.
Published by :
shweta walge
Published on

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली झाली आहे. त्यानंतर आता मुंबईचे आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी केली होती.

पुढील डीजीपी निवडीसाठी मुख्य सचिवांना 05 नोव्हेंबर 2024 (दुपारी 1.00 वाजता) पर्यंत वेळ देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निर्धारित वेळेत आयोगाकडे पाठवावी लागतील.

कोण आहेत विवेक फणसाळकर?

- विवेक फणसाळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

- मुंबई पोलिस आयुक्तपदी निवड होण्याआधी महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे संचालक होते.

- २०१६-१८ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

- दहशतवाद विरोधी पथकाचेही ते प्रमुख होते.

- पुण्याचे असलेल्या फणसळकर यांची अकोला येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून पहिली नेमणूक झाली होती 'कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'मध्ये दक्षता विभागाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले.

- नाशिक पोलीस आयुक्तालयात उपायुक्त म्हणून कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी वर्धा आणि परभणीत अधिक्षक पद भूषविले.

- विवेक फणसळकरांना मुंबईची आणि मुंबई पोलिस दलाची चांगल्या प्रकारे माहिती आहे.

- मुंबई पोलिस दलात प्रशासन विभाग आणि मुंबईच्या वाहतूक कोंडीची समस्या हाताळणाऱ्या वाहतूक शाखेचे सहआयुक्त म्हणून त्यांनी भरीव काम केले.

- शांत स्वभाव पण तितकेच शिस्तप्रिय आणि इंग्रजीवर प्रभुत्व ही फणसळकर यांची वैशिष्ट्ये आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com