सांगलीच्या निर्णयाचा फेरविचार करावा; विश्वजीत कदमांची कळकळीची विनंती
सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेली आहे. त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेली आहे. त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मविआच्या जागावाटपानंतर सांगलीत मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे, सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी स्थानिक नेत्यांनी राज्य आणि केंद्रातील नेत्यांकडे प्रयत्न केले. यावरच काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली.
काय म्हणाले विश्वजीत कदम?
सांगलीची जागा ही काँग्रेसला लढायला मिळावी, काँग्रेस त्याला सक्षम आहे. या भावना घेऊन आम्ही वरिष्ठकडे पोचवल्या. गेल्या काही दिवसात मविआ अंतर्गत ज्या बाबी झाल्या त्यामध्ये कोल्हापूरची जागा शाहू महाराज लढणार असे जाहीर झाले.
उद्धव ठाकरे यांनी अचानक चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. ठाकरे बद्दल आम्हाला आदर पण सांगलीचा जो इतिहास आहे तो समजून घेऊन उमेदवारी झाली असती तर आज जी परिस्थिती आहे ती निर्माण झाली नसती.
आजही आमची मविआमधील सर्व नेत्यांना विनंती की संगळीची परिस्थिती पाहुन उमेदवारी बाबत फेरविचार करावा. महाविकास आघाडीला सत्य परिस्थितीची माहिती घेऊन, पुन्हा फेरविचार करावा अशी विनंती महाविकास आघाडीला केली आहे.
काँग्रेसचे नेते, आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांसह जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील, महेंद्र लाड, जितेश कदम यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद झाली.