विशाळगडप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी; अंतिम सुनावणीपर्यंत बांधकामांना संरक्षण देण्याची मागणी

विशाळगडप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी; अंतिम सुनावणीपर्यंत बांधकामांना संरक्षण देण्याची मागणी

विशाळगडप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

विशाळगडप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गडावरील बांधकामांना संरक्षण देण्याबाबत कोर्टात याचिका दाखल करण्यात आले. अंतिम सुनावणीपर्यंत बांधकामांना संरक्षण देण्याची मागणी आहे. हायकोर्टाच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलेले आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने हाती घेतलेली मोहीम तसेच विशाळगड अतिक्रमणांपासून वाचवण्यासाठी उजव्या विचारसणीच्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनेचे प्रकरण गुरुवारी हायकोर्टात पोहोचले. त्यावेळी, कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांना विशाळगडावरील बांधकामे पाडण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन प्रकरणावर आज तातडीची सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले.

विशाळगडप्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी; अंतिम सुनावणीपर्यंत बांधकामांना संरक्षण देण्याची मागणी
Mumbai Rain: मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात

न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला याच्या खंडपीठासमोर ही याचिका गुरुवारी सादर करण्यात आली. याचिकेत विशाळगडावरील बांधकामांना याचिकेवरील अंतिम सुनावणीपर्यंत संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com