Vinayak Raut : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी स्वतःच्या मंत्री पदाची काळजी करावी 

Vinayak Raut : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी स्वतःच्या मंत्री पदाची काळजी करावी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रत्येकजण एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रत्येकजण एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत (Vinayak Raut ) यांनी केंद्रीय मंत्री  नारायण राणे  यांना खडेबोल सुनावले आहेत.

शिवसेना (shivsena) कोणाच्या ताब्यात जाणार नाही आणी कदापी  शिवसेना संपणार नाही त्यामुळे  केंद्रीय मंत्री  नारायण राणे (Narayan Rane) यांनी स्वतःची काळजी व आपली राजकीय काळजी करावी.

राणे याचे मंत्री पद काही महिन्यात जाणार आहे, केंद्रीय मंत्रिपद मिळून पण त्यांनी चांगलं काम देशात केलं नाही अशी माहिती समोर येत आहे . तसेच  आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना मंत्री पद पालकमंत्री पद  मिळण्यासाठी मी स्वतः पक्ष प्रमुख यांच्याकडे मागणी केली होती आपल्यावर चुकीचा  आरोप आमदार  दीपक केसरकर करत आहेत. असे खळबळजनक विधान सावंतवाडीत पत्रकार परिषद मध्ये खासदार विनायक राऊत यांनी केलं.

सिंधुदुर्ग (Shindhudurg) जिल्ह्यात शिवसेना पुन्हा जोमाने उभारी घेणार आहे . सावंतवाडीत पुन्हा शिवसेनेचाच आमदार विजयी होणार आहे त्यामुळे शिवसेनेला ज्यांनी ज्यांनी फसवले त्याची हालत बेकार झाली आहे. राजकीय अस्तीत्व संपलं आहे . आज जे बंडखोर पळून गेले  त्यांना कदापि पुन्हा शिवसेनेत घेतले जाणार नाही आज आपले पाप लपवण्यासाठी संजय राऊत यांच्यावर हे बंडखोर आरोप करत आहेत. तसेच काही दोन खासदार शिंदे गटात जाऊ शकतात मात्र बाकीचे कोण जाणार नाही . असे राऊत यावेळी बोलले.

यावेळी आमदार वैभव नाईक . गौरीशंकर खोत , संदेश पारकर . संजय पडते , विक्रांत सावंत, जान्हवी सावंत, अतुल रावराणे , डॉ जयेंद्र परुळेकर , सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ वेंगुर्ला तालुका प्रमुख  बाळू परब ,सागर नाणोसकर बाळा दळवी तसेच शिवसेना कार्यकर्ते  पदाधीकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Vinayak Raut : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी स्वतःच्या मंत्री पदाची काळजी करावी 
‘हा’ आमदार भ्रष्टाचारी; मंत्रीपद देऊ नका; भाजपाचा हा पदाधिकारी फडणवीस आणि अमित शाहांना लिहिणार पत्र
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com