विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीकडून मृत्यूबाबत संशय व्यक्त; म्हणाल्या…

विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीकडून मृत्यूबाबत संशय व्यक्त; म्हणाल्या…

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. त्यांचं पार्थिव बीडमधील केज तालुक्यातील राजेगाव या त्यांच्या मूळगावी दाखल झालं आहे. गावातील लोक, त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांना अंत्यदर्शन घेता यावं यासाठी त्यांचं पार्थिव शिवसंग्राम भवनात आणि त्यांच्या घरात ठेवण्यात येणार आहे. विनायक मेटेंवर आज दुपारी तीन वाजता राजेगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम दाखल करण्यात आलं होतं. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे.मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

या सर्व पार्श्वभूमीवर विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीकडून मृत्यूबाबत संशय व्यक्त केली जात आहे. एका माध्यमांशी बोलताना मेटे यांच्या पत्नीने सांगितले की, “मला जेव्हा घटनेची माहिती मिळाली, तेव्हा मी अक्षरश: धावत सुटले. मी विश्वास नांगरे पाटलांना फोन केला, माझा भाऊदेखील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आहे, मी त्यालाही फोन केला. पण दोघांनीही कॉल उचलला नाही.”“शेवटी मी वाहतूक पोलिसांना फोन केला. कारण चालक मला सांगत नव्हता की तो नेमका कुठे आहे? त्याला नेमकं ठिकाण सांगता येत नसेल, तर तू व्हॉट्सअॅपवर लोकेशन पाठव… असं मी त्याला सांगत होते. पण त्याने तसं केलं नाही. शेवटी मला वाहतूक पोलिकांकडूनच कळालं की साहेबांना एमजीएम कामोठे रुग्णालयात दाखल केलं आहे. मी रुग्णालयात पोहोचेपर्यंत तेही तिथे पोहचले होते.”

यासोबतच त्यांनी सांगितेल की, “मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे साहेबांना पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की काहीतरी वाईट घडलंय. कारण मेडिकल टर्मीनोलॉजीनुसार, मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही. काही वेळ गेल्यानंतर तो पांढरा पडतो. पण साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता. त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्त येत होतं. रुग्णालयात गेल्याबरोबर मी त्यांच्या नाडीचे ठोके तपासले. त्याठिकाणी डॉक्टरही होते, त्यांनी मला बाहेर जाण्यास सांगितलं. पण मी विनायक मेटेंची बायको आणि डॉक्टर असल्याचं त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला तिथे थांबण्याची परवानगी दिली. मी साहेबांच्या हाताची आणि मानेची नाडी तपासली, पण ती हाताला लागली नाही. ईसीजीमध्येही कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या.”“त्यानंतर मी माझ्या भावाला सांगितलं की, हे थोड्या वेळापूर्वी घडलेलं नाही. मला फोन आल्यानंतर मी जवळपास पाऊण तासात याठिकाणी पोहोचले. पण ही पाऊण तासांपूर्वी घडलेली घटना नव्हती, ही घटना घडून किमान दोन तास उलटले होते, म्हणजे आमच्यापासून काहीतरी लपवलं जात होतं. कदाचित ते लपवतही नसतील, मीच भयाकुल असेल, नेमकं काय असेल? हे मला माहीत नाही. पण मला फोन येण्याअगोदर अपघाताची घटना घडून खूप वेळ झाला होता. या सर्व बाबी आता शवविच्छेदन अहवालातून समोर येतील, मृत्यूची नेमकी वेळही समजेल” असे त्या म्हणाल्या.

विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीकडून मृत्यूबाबत संशय व्यक्त; म्हणाल्या…
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यावर आज अंत्यसंस्कार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com