विनायक  मेटेंचा मृत्यू ब्रेनइंज्युरीमुळे? डॉक्टरांची मोठी माहिती

विनायक मेटेंचा मृत्यू ब्रेनइंज्युरीमुळे? डॉक्टरांची मोठी माहिती

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून पुणे ते मुंबई प्रवास करताना मेटे यांचे वाहन अनोळखी वाहनावरती आदळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम दाखल करण्यात आलं होतं.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून पुणे ते मुंबई प्रवास करताना मेटे यांचे वाहन अनोळखी वाहनावरती आदळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम दाखल करण्यात आलं होतं.

पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे.मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

त्यांच्या निधनाविषयी माहिती देताना कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले की, विनायक मेटे यांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं, त्यावेळी त्याना तपासण्यात आलं. रुग्णालयात दाखल करताना त्यांना पल्स नव्हते. याचाच अर्थ विनायक मेटे यांची नाडी तपासली असता नाडीदर शून्य होता. तर हार्टबिटही नव्हते. ईसीजीमध्ये विनायक मेटे यांचा रिपोर्ट फ्लॅट लाईनप्रमाणे आलेला होता. तर बिपी अर्थात ब्लड प्रेशरही नव्हतं, त्यामुळे तेव्हा त्यांना तपासण्यात आलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ऑन द स्पॉट त्यांचा मृत्यू झाला होता का, यावर आता भाष्य करता येणार नाही, अशी मोठी माहिती डॉक्टरांनी दिली.

विनायक  मेटेंचा मृत्यू ब्रेनइंज्युरीमुळे? डॉक्टरांची मोठी माहिती
विनायक मेटेंना अपघातानंतर तासभर मदतच मिळाली नाही
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com