तुळजाभवानी मंदिरात विजयादशमी उत्साहात साजरी
बालाजी सुरवसे, उस्मानाबाद
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा दसरा म्हणजे सिमोल्लंघनाचा सोहळा आज पहाटे मोठ्या उत्साहात पार पडलाय. गेली नऊ दिवस तुळजाभवानी देवीचे नवरात्रत उत्सवात अलंकार पूजा करण्यात आल्या. त्यानंतर देवीचा मुख्य उत्सव म्हणजे विजयादशमी उत्सव पार पडला. देवीची मूर्ती पालखीत ठेवून देवी स्वतः मंदिराबाहेर भाविकांना येऊन दर्शन देते.
गुलाल व फुलांच्या उधळनाने आणि आई राजा उदो उदोच्या जयघोषाने विजयादशमी दसरा सण साजरा करण्यात आलाय. देवी महिषासुर दैत्यासोबत गेली नऊ दिवस देवी युध्द खेळत होती महिषासुर दैत्याचा देवीने वध केल्यानंतर साजरा होणारा विजय उत्सव म्हणजे दसरा अशी आख्यायिका सांगितली जाते. तुळजाभवानी देवीची मूर्ती चल मुर्ती असुन देवी आज आपल्या सिहांसनावरुन बाहेर आणले जाते.
यावेळी देवीच्या मुर्तीला एकशे आठ साड्या गुंडाळून देवीचे माहेर असलेल्या अहमदनगर येथुन मानाच्या पालखीतुन देवीची वाजत गाजत मिरवणूक काढली गेली.