ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; विजय वडेट्टीवार म्हणाले...
ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागांचा बैठकीतील निर्णय अंतिम होणे बाकी असताना उद्धवजी ठाकरे यांनी ज्या दोन जागांवर उमेदवार घोषित केलेला आहे. थोडा जर आघाडीचा धर्म जर पाळला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता. तिन्हही पक्ष मिळून अंतिम निर्णय घ्यायचा असतो. आणि चर्चा संपली नाही.
चर्चा सुरु आहे. अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे आघाडी धर्माला निश्चितपणे गालबोट लावल्यासारखं मला वाटतं. यावर त्यांनी जर पुनर्विचार केला तर तिन्हही पक्ष मिळून खुल्या मनानं या निवडणुका आपल्याला पार पाडता आले असते. असे वडेट्टीवार म्हणाले.