Baba Siddique; सत्ताधारी पक्षातील नेते सुरक्षित नसतील तर राज्य सुरक्षित आहे का..? वडेट्टीवारांचा प्रश्न
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांचा अखेर गोळीबारात मृत्यू झाला आहे. बांद्र्यातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयावर जवळ बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत सरकारला धारेवर धरलं आहे. आज माध्यमांशी संवाद साधत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले की,
बाबा सिद्दिकी राजकारण समाजकारणात सक्रिय असणारे नेते होते, ते काही कारणाने काँगेस सोडुन अजित पवार कडे गेलेत. आमदार राज्यमंत्री राहिले माझे चांगले संबंध होते. त्यांना वायप्लस सुरक्षा असताना ही घटना घडणे गंभीर बाब आहे. वारंवार घडणाऱ्या घटना पाहता कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला. सत्ताधारी नेत्यांसोबत अशी घटना घडणे म्हणजे कायद्याचा आणि पोलिसाचा धाक कुठेही राहिलेला दिसतं नाही. जर सत्ताधारी पक्षातील नेते सुरक्षित नसतील तर राज्य सुरक्षित आहे का..?
या घटनेचा आम्हाला दुःख आहे त्यामुळे राज्यात कोण सुरक्षीत हा प्रश्न..? या घटनेनंतर सत्ताधारी आता बुलेट प्रुप जॅकेट घालून स्वतःची सुरक्षा स्वतः करावी असे वाटते. सत्ताधारी यांनी आता जाहिरातीच्या फलकात तुमची सुरक्षा तुम्ही करा सरकार जबाबदार नाही असे फलक जागोजागी लावले तर लोक आपापली सुरक्षा करतील अशी वेळ महाराष्ट्रावर आली.
मी बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांना यामधून सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो.
सत्ताधारी योजना मध्ये आणि सत्ता मिळवण्यात व्यस्त आहे त्यांना हे सगळं करायला वेळ नाही. सलमान खान यांच्यावर गोळीबार झाला त्यांच्या घरावर रेखी केली गेली, त्याचं काय झाल.? मुंबईतील ही सहावी घटना आहे. आतापर्यंत मुंबई शांत होती, अंडरवर्ल्ड संपलं होतं अशा स्थितीत अशा घटना घडणे म्हणजे राज्यात पोलिसांचं सरकारचं राज्य राहिले नाही आता गुंडांचे राज्य झालं. कारण पुणे सारख्या शहरात एक मंत्री यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांच्या टोळीला पोचण्याचं काम करत असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेने नेत आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
कोणती घटना असली तरी त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि या घटनेमागे काय कारण आहे हे चौकशी मधूनच पुढे येणार जर तर हे सोडा त्यांच्या व्यवसायात होते. कुठल्या कारणाने झालं हे ठामपणे सांगता येणार नाही ती त्या व्यवसायात होते मात्र त्यांच्या कार्यालयासमोर येऊन गोरक्षण असताना गोळी झाडली जात असेल तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.