पार्थ पवारांच्या Y प्लस सुरक्षेवरून वडेट्टीवारांचा हल्लाबोल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांना 'वाय-प्लस' श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यावरच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पार्थ पवार कुठल्याही पदावर नसताना त्याला कुठले निकष लावून सुरक्षा दिली असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे.
ते म्हणाले की, पार्थ पवार कुठल्याही पदावर नसताना त्याला कुठले निकष लावून सुरक्षा दिली. मी राज्याचा विरोधीपक्ष नेता असताना मला Y प्लस सुरक्षा देताना यांचे हाथ कापत होते, मला 10,20 वेळा फॉलोअप घेतल्यावर सुरक्षा मिळाली. इतर Y प्लस नेत्यांना चार गार्ड असतात मला फक्त 2 गार्ड दिले. फक्त उपमुख्यमंत्री यांचा मुलगा म्हणून सुरक्षा देण्यात आली.
अंधेर नगरी चौपट राजा अशी स्थिती राज्यात आहे. लोकसभा पडलेल्या माणसाला लोकसभेत दहशत निर्माण करण्यासाठी सुरक्षा दिली, पराभव दिसत असल्याने अशी सुरक्षा दिली का याचे उत्तरं राज्य सरकारला द्यावे लागेल. असं ते म्हणाले.
तसेच ते म्हणाले की, भुजबळ यांना दिल्लीतून निवडणूक लढण्याच्या सूचना होत्या तर मग छगन भुजबळ यांनी ही निवडणूक लढून अडीच वर्षे त्यांना तुरुंगवास झाला त्याचा बदला घेण्याची ही योग्य संधी असून त्यांच्या छातीवर मूग दळावी, दिल्लीत राहून त्यांना त्याचा बदला घेत येईल असा मला विश्वास आहे