गुंजवणी सिंचन प्रकलपाबाबत विजय शिवतारे यांचे  आमदार संजय जगताप यांच्यावर आरोप

गुंजवणी सिंचन प्रकलपाबाबत विजय शिवतारे यांचे आमदार संजय जगताप यांच्यावर आरोप

पुरंदर तालुक्यासाठी महत्त्वाचा असलेला गुंजवणी सिंचन प्रकल्प हा नेहमीच विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचा विषय राहिलेला आहे.
Published by :
shweta walge
Published on

पुरंदर तालुक्यासाठी महत्त्वाचा असलेला गुंजवणी सिंचन प्रकल्प हा नेहमीच विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचा विषय राहिलेला आहे.आता विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर आमदार संजय जगताप आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याकडून परस्परविरोधी दावे केले जातायत. गुंजवणी प्रकल्प जोपर्यंत मूळ योजनेनुसार होत नाही तोपर्यंत या योजनेच काम करू देणार नाही असा पवित्र आमदार संजय जगताप यांनी घेतला होता.

मात्र आज नीरा येथे माजी मंत्री विजय शिवतरे यांनी मूळ प्रकल्पात बदल हा आमदार संजय जगताप यांनीच केल्याचा आरोप केलाय. 21 जुलै 2020 रोजी या योजनेत बदल केल्याचा दावा त्यांनी केलाय.तर या संदर्भातील कागदपत्रे माहिती अधिकारातून आपण मिळवली असून लवकरच लोकांसमोर मांडणार असल्याचे देखील त्यांनी म्हटलय.तर यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा देखील त्यांनी केलाय.शिवतारे हे आज नीरा येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हा आरोप केलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com