ताज्या बातम्या
विजय शिवतारे 'या' दिवशी बारामतीमधून लोकसभा निवडणुकीसाठी फॉर्म भरणार
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
चंद्रशेखर भांगे, पुणे
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विजय शिवतारे 12 एप्रिलला बारामतीमधून लोकसभा निवडणुकीसाठी फॉर्म भरणार असल्याची माहिती मिळत आहे.
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात विजय शिवतारे 12 तारखेला फॉर्म भरणार असल्याची माहिती मिळत आहे. 1 एप्रिल रोजी सासवडच्या पालखीतळावरुन ते प्रचाराला सुरुवात करणार असून 12 एप्रिलला दुपारी बारा वाजता शिवतारे लोकसभेसाठी फॉर्म भरणार आहेत.
बारामती लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.