Vijay Shivtare : वैयक्तिक वाद असतात, मतभेद असतात पण मनभेद नाहीत

Vijay Shivtare : वैयक्तिक वाद असतात, मतभेद असतात पण मनभेद नाहीत

बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचाराचा शुभारंभ झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, आज बारामतीच्यादृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा हा ऐतिहासिक दिवस. या दिवशी खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात जी एक क्रांती होते आहे. त्या क्रांती पर्वाचा पहिला दिवस हा निश्चितपणे आजचा हा प्रचाराचा शुभारंभाचा दिवस असं मानलं तर काही गैर वाटणं होणार नाही. या राज्याच्या आणि देशाच्यादृष्टीने अतिशय महत्वाची ही निवडणूक आहे. असं का म्हटले जात आहे. ही निवडणूक काहीअंशी अशाप्रकारे अपप्रचार केला जातोय. ही निवडणूक म्हणजे काका - पुतण्याचे भांडण आहे, ही निवडणूक म्हणजे नणंद - भावजयचे भांडण आहे. अजिबात नाही. याला असा भावनात्मक रंग दिला जातो आहे. पण खऱ्या अर्थाने ही निवडणूक असेल तर ती देशाचे पंतप्रधान तिसऱ्यावेळा नरेंद्र मोदी यांना करण्यासाठी.

सुनेत्रा ताई यांना मिळालेलं प्रत्येक मत हे मोदींना मिळालेलं मत आहे. देशाच्या व्यापक हितासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. म्हणून पहिल्या कार्यकर्त्यांनी हा भावनात्मक जो प्रश्न केला जातो त्याचं खंडण गावोगावी आणि प्रत्येक ठिकाणी केलं पाहिजे. मित्रहो नरेंद्र मोदींनाच का आपण पंतप्रधान करायचं? याची अनेक उदाहरण देता येतील पण एक महत्वाचे उदाहरण आपल्याच इथलं सांगतो. विकासाचा प्रश्न घेऊन विकासासाठी मुख्य प्रवाहात गेलं पाहिजे. या देशाची संपूर्ण सत्ता ही नरेंद्र मोदींच्या हातात दिली तर देश सुरक्षित आहे. विश्वभरामध्ये तो प्रसिद्ध होतोय. म्हणून असं म्हणत अजितदादांनी महायुतीत प्रवेश केला. हा देखील तितकाच महत्वाचा प्रसंग आहे. कुणी त्याला वेगवेगळी नाव दिली असतील पण त्याच्या पाठिमागचा हेतू हा निश्चितपणे प्रांजल आणि स्वच्छ आहे. याच्याबद्दल माझ्या मनात जरासुद्धा शंका नाही. मला सांगा सत्तर - पंच्याहत्तर वर्ष राज्य करत होते,काँग्रेसची मंडळी. पण कधी कुणाच्या लक्षात आलं का की, गरिबाला घर मिळाली पाहीजे, 2 कोटी गरिबांना देशात घरं मिळाली पाहिजेत. म्हणून अतिशय संवेदनशील पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरु केली. या पुणे जिल्ह्यामध्ये वीस हजार घरं ज्या शेतकरी शेतमजूर असेल त्याला पाच रुपयाची अडचण आहे अशा शेतमजूराचे घर व्हावं, त्याचे छप्पर व्हावं. अडीच लाख रुपये देण्याचे काम हे पंतप्रधानांनी केलं. आपल्या महिला जेव्हा स्वयंपाक करतात त्यावेळेस निश्चितपणे त्यांना जो त्रास होतो धुराचा तो जावा आणि म्हणून उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून 50 कोटी महिलांना गॅस देण्याचे पवित्र काम हे या पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं. जनधन योजना असेल अनेक योजना ज्या सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेऊन ज्या केल्या आहेत म्हणून या माणसाला निस्वार्थ या प्रकारचा माणूस, स्वत:चे काही नाही 365 दिवस देश, देश आणि देश. 24 तास लोकांची चिंता असा करणारा एक नेता आम्हाला जो मिळाला आहे तो जपला पाहिजे. म्हणून आम्ही सर्वजण महायुतीचे लोक एकत्र एक हा रणसंग्राम सुरु आहे. म्हणून पहिल्यांदा मला तुम्हाला सांगावसं वाटतंय की, कोणीही निवडणूक भावनात्मक बाजूकडे न नेता ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशाचप्रकारची आहे. प्रत्येक मत जे सुनेत्रा वहिनाला जातंय ते प्रत्येक मत हे मोदींच्यापर्यंत पोहचत आहे. या भावनेनंच आपण सर्वांनी काम केलं पाहिजे.

यासोबतच ते म्हणाले की, स्थानिक लेव्हलला मी एखादा गोष्टीचा हट्ट धरुन काम केलं तर कदाचित संपूर्ण महायुतीला तडा जाईल आणि महाविकास आघाडीचं आयतं फावेल आणि म्हणून मुख्यमंत्री, दादा आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आम्ही सगळे तिघे दोन तास बसलो वर्षावर आणि त्यावेळेस मी म्हटले की ठिक आहे. व्यापक हितासाठी मी थांबेन परंतु त्याच्याबरोबरीने मी जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघात फिरलो त्यावेळी ज्या ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. त्या गोष्टी तुम्ही मान्य करुन कार्यवाही केली पाहिजे. मोठ्या मनानं ते केलं. म्हणून मला मुद्दाम सांगावस वाटतं बारामतीतील त्या दुष्काळी पट्ट्यातील कार्यकर्ते इथं नक्की असतील. मी पहिल्यांदा ती योजना मांडली. दादांनी एक मिनिटामध्ये होय अतिशय महत्वाची योजना आहे. दादांच्या हातामध्ये तिजोरीची चावी आहे. कल्पकता आहे. आमच्यासारखे सर्व लोक बरोबर आहेत. निश्चितपणे हा पन्नास वर्षाचा प्रश्न मार्गी लागेल. आणि म्हणून सर्वच ठिकाणचं हे जे प्रश्न मी बोललो ते ते प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केलं. सुरवातीचा काळ निश्चितपणे अडचणीचा होता मला देखील त्याच्याबद्दल खंत होती. परंतु निश्चितपणे एक कार्यसम्राट अशाप्रकारचे नेतृत्व एक दिवसरात्र लोकांसाठी झटणारे नेतृत्व आहे. वैयक्तिक वाद असतात, मतभेद असतात पण मनभेद नाहीत. म्हणून ते सगळे मतभेद सोडून दादांच्या पाठिमागे ताकदीने उभं राहणं हे कर्तव्य मी समजून पुढचं काम आता करतो आहे. भाषण खूप होत आहेत पण मला एकच सांगायचं आहे, जो कार्यकर्ता ज्या बूथमध्ये राहतो त्या बूथचं तुम्ही शोधा विजय शिवतारे कुठच्या बूथमध्ये आहे एका सेकंदात तुम्हाला मोबाईलमध्ये माहित पडतं. त्या बूथची जबाबदारी तुमची आहे. बाहेर तुम्ही जिल्हाप्रमुख असाल, तालुकाप्रमुख असाल आणि तुमच्या बूथवर तिथं मत कमी पडली तर ते चालणार नाही. म्हणून आपण अतिशय काळजीने आणि ज्या पद्धतीने बूथ पकडलं पाहिजे. बूथमध्ये एवढे हजारो कार्यकर्ते आहेत. आज इथं असणारे हे दहा हजार लोक असतील. या दहा हजार लोकांनी जरी नीट ठरवलं की प्रत्येक बूथ आपण व्यवस्थित करायचा. बारामतीमध्ये कीती चारशे - सव्वाचारशे बूथ असतील. किती लोक एका बूथवर येतील. भावनेच्या आहारी न जाता बूथ सांभाळा. बूथवर लक्ष द्या. बूथमधून जो निर्णय लागेल तो तुमचा निर्णय असेल आणि निश्चितपणे मी माझ्याकडे पुरंदरला तेच करत असतो. एक लाख मतं भोरमध्ये महायुतीला निश्चितपणे मिळतील याच्याबद्दल शंका नाही. अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला काम करावं लागेल आणि सुनेत्रा ताईंना विजयी करण्यासाठी इथं देखील निदान पन्नास - साठ हजारांचे लीड आपण जर दिलं तर निश्चितपणे तो विजयाचा एक सुकर मार्ग होईल. असे विजय शिवतारे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com