Vidhansabha Election 2024: राज्यात निवडणुकांचा डबल धमाका

Vidhansabha Election 2024: राज्यात निवडणुकांचा डबल धमाका

राज्यात निवडणुकांचा डबल धमाका पाहायला मिळणार आहे. विधानसभेसोबतच 29 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

राज्यात निवडणुकांचा डबल धमाका पाहायला मिळणार आहे. विधानसभेसोबतच 29 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. लांबणीवर पडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने काढले आहेत.

विधानसभेसोबतच सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. शासनाच्या आदेशानुसार यापूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, आता या निवडणूका घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या बरोबरीनेच राज्यातील 29 हजार 443 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचाही रणधुमाळी पाहिला मिळणार आहे.

सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार राज्य स्तरावर निवडणुका सुरू होण्यामध्ये अ वर्गातील 42, ब वर्गातील 1716, क वर्गातील 12250 आणि ड वर्गातील 15435 मिळून 29 हजार 443 सहकारी संस्थांचा निवडणुकीमध्ये समावेश आहे. तर पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने पुणे शहरातील 828 आणि पुणे जिल्ह्यातील 2220 मिळून एकूण 3 हजार 48 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com