Vidhan Parishad Election : बहुजन विकास आघाडीची तीन मतं कुणाला? अद्याप सस्पेन्स कायम

Vidhan Parishad Election : बहुजन विकास आघाडीची तीन मतं कुणाला? अद्याप सस्पेन्स कायम

विधान परिषदेच्या निवडणुकीत लहान पक्ष व अपक्ष आमदारांची १५ मते असून, ती निर्णायक ठरणार आहेत. बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांसाठी भाजप, काँग्रेस आणि 'राष्ट्रवादी'च्या उमेदवारांनी त्या पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटी घेतल्या.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

संदीप गायकवाड | विरार : विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सहा आणि भाजपचे पाच उमेदवार रिंगणात असून, महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.आज, सोमवारी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर सायंकाळी पाचनंतर मतमोजणी सुरू होणार आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीची (Bahujan Vikas Aghadi) तीन मते विधानपरिषदेसाठी कोणाला मिळणार हे अजूनही गुलदस्यात आहेत. सर्व पक्षासाठी ही तीन मतं महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसापासून सर्व पक्षाचे उमेदवार नेते मंडळी आमदार हितेंद्र ठाकूरांची (Hitendra Thakur) गाठीभेठी घेत होते.

Vidhan Parishad Election : बहुजन विकास आघाडीची तीन मतं कुणाला? अद्याप सस्पेन्स कायम
Vidhan Parishad Election Live : भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजयी गुलाल

आमदार क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur) हे आज मतदनासाठी येणार का हा सस्पेन्स आता मिटला आहे. ते आज पहाटे सव्वा तीन वाजता मुंबईत दाखल झाले आहेत. ते मुंबईहून विधानपरिषदेत दाखल होणार आहे. हितेंद्र ठाकूर आणि राजेश पाटील हे विरारहून दुपारी ११ ते १२ च्या दरम्यान मुंबईला निघणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com