ठाकरे सरकारने दिरंगाई केल्यामुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर?
प्रशांत गोडसे, मुंबई
सध्या राज्यातील उद्योगांचे प्रकल्प हे राज्यातून बाहेर जाण्याची प्रकरणं सुरू आहेत. वेदांता फॉक्सकॉन व त्यानंतर आता टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजप व शिंदे सरकारवर टीका केली जातेय तर, भाजप व शिंदेगटाकडून हे प्रकल्प ठाकरे सराकरच्याच काळात राज्याबाहेर गेल्याचं सांगितलं जातंय. आता वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं धक्कादायक कारण समोर आलंय.
माहिती अधिकारातून MIDC ने केला खुलासा:
तत्कालीन सरकारने दिरंगाई केल्यामुळे हा प्रकल्प बाहेर गेलाय असे समोर आलंय
हा प्रकल्प आपल्या राज्यात थांबवा म्हणून प्रयत्नच करण्यात आले नाही.
असा खुलासा या माहिती अधिकाऱ्यात समोर आलाय.
MIDC ने असा खुलासा माहिती अधिकारात दिलाय.
MIDC ने केलेल्या या खुलास्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.