Vasant More : वसंत मोरे निवडणुकीला असताना कोणतीही निवडणूक पुणे शहरामध्ये एकतर्फी होणार नाही
वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वसंत मोरे म्हणाले की, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सोडून 10 दिवस झाले. 10 दिवसांमध्ये मी पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने जो काही या पाच वर्षांमध्ये जो संपूर्ण शहराचा खेळखंडोबा करुन ठेवला आहे आणि एवढे सगळं होऊनसुद्धा जर निवडणूक एकतर्फी होणार अशा पद्धतीने जर कोणी वल्गना करत असेल तर जोपर्यंत वसंत मोरे या पुणे शहरामध्ये आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये मी निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही. पहिल्यांदाच मी पक्षातून बाहेर पडलो. ते कुठल्या पक्षात जाण्यासाठी बाहेर पडलेलो नाही. मी निवडणूक लढवणार. 100 टक्के वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात असणार. याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही आहे. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी आदरणीय शरद पवार साहेब असतील, खासदार सुप्रियाताई सुळे असतील, खासदार संजय राऊत साहेब असतील. काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्यादेखील मी भेटी घेतल्या.
प्रत्येकाला मी पुणे शहरामध्ये एक मूठ बांधली जाऊ शकते. हे मी प्रत्येकाला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सगळं करत असताना मी निवडणूक लढणार या विषयावर मी ठाम होतो आणि आजसुद्धा मी त्या विषयावर ठाम आहे. त्यामुळे वसंत मोरे निवडणुकीला असताना कोणतीही निवडणूक पुणे शहरामध्ये एकतर्फी होणार नाही याची मी खात्री देतो. मी एकला चलोच्या भूमिकेमध्ये पुणे शहरामध्ये आहे. आम्ही एकला चलो रे या विषयावरती पुणे शहरात ठाम राहिल. कुणी कुणी माझ्या वाटेमध्ये काटे टाकले ते सगळे काटे मी योग्यवेळी बाहेर काढणार आहे आणि या सगळ्या गोष्टी मला ज्या पुणेकरांसमोर मांडायच्या आहेत.
मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. निवडणुक एकतर्फी जर व्हायची असती ना तर याला त्याला फोन करायला लावलं नसते आणि या सगळ्या गोष्टी मी योग्यवेळी बाहेर काढेन. पुणेकरांच्या समोर स्टेजवरती बाहेर काढेन. 12 तारखेपासून ते आजच्या 22 तारखेपर्यंत या दहा दिवसांमध्ये ज्या वसंत मोरेंनी बाहेर पडल्यानंतर दहा दिवसांच कुणाकुणाच्या पायाखालची वाळू सरकवली होती या सगळ्या गोष्टी मी येणाऱ्या दहा दिवसांमध्ये मी बाहेर काढेन असे वसंत मोरे म्हणाले.