Vasant More : “आजच सांगतो, किती पण ताकद लावा…”वसंत मोरेंचं थेट शिंदे सरकारला आव्हान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. देवेंद्र फडणवीसांकडून (devendra fadanavis) जेव्हा एकनाथ शिंदेच्या नावाची घोषणा करण्यात आली. तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
त्यादिवसापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. निक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील महाविकास आघाडीच्या निर्णयांमध्ये शिंदे सरकार बदल करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र आता या विषयावरुन मनसेचे (mns)पुण्यातील नेते वसंत मोरे (vasant more) यांनी शिंदे सरकारला आव्हान दिलंय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (raj thackeray) मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनापासून चर्चेत आलेले वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
वसंत मोरे यांनी शिंदे सरकारला आव्हान देताना म्हणाले की, “सरकार बदलले, असं ऐकतोय. प्रभाग रचनाही बदलणार आहात म्हणे. सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार,” असं म्हणत मोरे यांनी एक ट्विट केलंय. पुढे ते म्हणतात, “माझे सरकारला एक आव्हान आहे. हिम्मत असेल तर मग महापौर सुद्धा जनतेतून निवडा. आजच सांगतो, किती पण ताकद लावा, पुण्याचा महापौर मनसेचाच असेल.” असे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदे सरकारला आव्हान दिलं आहे.