बँकेच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, वसंत मोरेंनी बँकेच्या नाम फलकाला फासले काळे

बँकेच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, वसंत मोरेंनी बँकेच्या नाम फलकाला फासले काळे

मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी कार्यकर्त्यांसोबत अहमदनगर येथील एका खाजगी बँकेच्या नाम फलकाला काळे फासले आहे.
Published by :
shweta walge
Published on

मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी कार्यकर्त्यांसोबत अहमदनगर येथील एका खाजगी बँकेच्या नाम फलकाला काळे फासले आहे.

या खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून अहमदनगरमधील गुगळे कॉलनी बुऱ्हाणनगर येथील मोहन आत्माराम रक्ताटे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. स्वत:ला संपवण्याआधी त्या व्यक्तीने वसंत मोरे यांच्या नावाने चिठ्ठीही लिहिली आहे. ज्यात बँकेचे दोन हफ्ते थकल्याने बँकेने मालवाहू टेम्पो जमा करून घेत परस्पर विक्री केल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्याशिवाय बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही पत्रात उल्लेख आहे.

दरम्यान मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी संबंधित पीडित कुटुंबियांची नगरमध्ये येऊन भेट घेतली, त्याचबरोबर पोलिसांची देखील भेट घेतली आणि संबंधित बँक कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली... त्यानंतर या खासगी बँकेत जात त्यांनी घटनेबाबत बँक कर्मचाऱ्यांना जाब विचारला.लवकरात लवकर संबंधित आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा टेम्पो निल करून त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावा अन्यथा मनसे स्टाईल खळखट्याक करण्याचा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com