'हा' घाट 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

'हा' घाट 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद

राज्यभरात अनेक ठिकाणी पावसामुळे आपत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यभरात अनेक ठिकाणी पावसामुळे आपत्ती होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यातच दरडी कोसळल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसतात. त्यात अनेकदा जीवित हानी होते.

याच पार्श्वभूमीवर आता भोर- महाड राष्ट्रीय महामार्गावरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंध घाट रस्ता पावसाळा कालावधीत अवजड वाहतुकीकरता संपूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. पावसाळा कालावधीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 22 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत भोर घाट अवजड वाहतुकीकरता बंद करण्यात येणार आहे. याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

हा रस्ता नागमोडी वळणाचा असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com