Pune : पुणे शहरात पुन्हा एकदा टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड

Pune : पुणे शहरात पुन्हा एकदा टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड

पुणे शहरात पुन्हा एकदा टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुणे शहरात पुन्हा एकदा टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. जनता वसाहत आणि धनकवडी परिसरात टोळक्यांनी मोटारी, रिक्षा, दुचाकींसह दहा वाहनांची तोडफोड केली.

यासोबतच गंगाधाम चौक परिसरातील गगन विहार सोसायटीतील दुचाकी पेटवून दिल्या ज्यामध्ये दोन दुचाकींसह मोटारीचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

जनता वसाहत परिसरात तोडफोडीत मोटारी, रिक्षा, दुचाकींसह सहा वाहनांचे नुकसान झाले असून या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com