परळीच्या वैद्यनाथ मंदिराची तोडफोड; माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

परळीच्या वैद्यनाथ मंदिराची तोडफोड; माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

परळीच्या वैद्यनाथ मंदिराची तोडफोड करण्यात आली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विकास माने, बीड

परळीच्या वैद्यनाथ मंदिराची तोडफोड करण्यात आली. माजी नगराध्यक्षाकडून मंदिराच्या शिखराची तोडफोड करण्यात आली. माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखांकडून शिखराची तोडफोड करण्यात आली.

बीडच्या परळीतील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वैद्यनाथ मंदिराच्या शिखरावर पायथ्याला शिवलिंग होते. जुन्या काळापासून या ठिकाणी परळीकर दर्शनाला जायचे मात्र वैजनाथ देवस्थान ट्रस्टने हे शिवलिंग काढून ही जागा बंद केल्याने देशमुख यांनी ही आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती मिळत आहे.

वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने याप्रकरणी परळी शहर पोलीसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याच पार्श्वभूमीवर आता माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी BNS 298,299,3/5 कलमाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com