वैभव खेडेकर यांना अॅस्ट्रोसिटी प्रकरणी अटकपूर्व जामीन
निसार शेख|रत्नागिरी: दलित वस्तीसाठी असलेल्या शासकीय निधीचा गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी भरणेबाईतवाडी येथील नाल्यावर पूल बांधल्याचा ठपका ठेवून समाजकल्याण आयुक्तांनी दाखल केलेल्या अॅस्ट्रोसिटीच्या गुन्ह्याप्रकरणी खेड नागरपरिषेदचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना अटकपूर्व जमीन मंजूर झाला आहे.
खेड अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर वैभव खेडेकर यांचे वकील ऍड. अश्विन भोसले यांनी जमीन मिळण्याबाबत केलेल्या युक्तिवाद ग्राह धरून न्यायाधीशांनी त्यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. या प्रकरणात वैभव खेडेकर यांना खेड न्यायालयाने २२ ऑक्टोबर रोजी अंतरिम अटकपूर्व जमीन मंजूर केला होता. आता त्यांना अटक पूर्व जामीन मंजूर करू नये अशी विनंती खेडचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी न्यायालयाला केली होती. मात्र ऍड. अश्विन भोसले यांनी न्यायालयाला जमीन मिळणे का गरजेचे आहे हे पटवून दिल्यावर न्यायालयाने खेडेकर यांना जमीन मंजूर केला.