UPSC Result : श्रुती शर्मा देशात अव्वल, तर राज्यात प्रियंवदा म्हादळकरनं मारली बाजी
UPSC 2021 चा निकाल जाहीर झाला असून, श्रुती शर्मा देशात अव्वल, अंकिता अग्रवाल दुसरी प्रियंवदा म्हादळकर महाराष्ट्रात अव्वल, देशात 13वी आली आहे. विषेश म्हणजे पहिल्या तीन टॉपर या मुलीच आहेत. यावेळी 685 उमेदवारांची यूपीएससीमध्ये निवड झाली. श्रुती सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी असून, ती जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादमीमध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होती. परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना upsc.gov.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
UPSC CSE प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी झाली आणि परीक्षेचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल 17 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आला होता. 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि 26 मे रोजी संपलेल्या परीक्षेची मुलाखत ही शेवटची फेरी होती.