pune breaking news
pune breaking news

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना; पाच वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना घडली आहे. कोंढवा परिसरात 5 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला आहे. मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत हे कृत्य करण्यात आले आहे.

तीन अल्पवयीन मुलांकडून चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे.

पाच वर्षीय मुलगा हा सोसायटीत खेळत असताना तिघांनी मोबाईल मधील अश्लील व्हिडीओ दाखवत त्याच्यावर अत्याचार केला असून कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com