दहिहंडी उत्सवादरम्यान एका मंडळाची अनोखी घोषणा; रस्त्यावरील खड्डयांचे विघ्न नको म्हणून केडीएमसीला करणार आर्थिक मदत
Team Lokshahi

दहिहंडी उत्सवादरम्यान एका मंडळाची अनोखी घोषणा; रस्त्यावरील खड्डयांचे विघ्न नको म्हणून केडीएमसीला करणार आर्थिक मदत

रस्त्यावरील खड्डयांचे विघ्न नको म्हणून केडीएमसीला करणार आर्थिक मदत
Published by :
shweta walge
Published on

अमझद खान |कल्याण : दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दहिहंडी साजरी केली जाणार. तर यावेळेस दहिहंडी उत्सवादरम्यान एका मंडळाने अनोखी घोषणा केली आहे. ज्यामध्ये दहिहंडी आणि गणेशोत्सवात खड्डय़ांचे विघ्न नको म्हणून दहिहंडी दरम्यान गोविंदा पथकांना देण्यात येणाऱ्या बक्षीसाच्या रक्कमेतून वाचलेले पैसे हे कल्याण डोंबिवली हद्दीतील खड्डे भरण्यासाठी महापालिकेस देणार असल्याची घोषणा कुणाल पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष कुणाल पाटील यांनी केली आहे. या घोषणोमुळे एक प्रकार महापालिकेच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले आहे.

कल्याण डोंबिवलीत उद्या ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. या पाश्र्वभूमीवर कल्याण पूर्व भागातील आडीवली ढोकळी परिसर कुणाल पाटील फाऊंडेशन आणि स्वर्गीय विजय पाटील मित्र मंडळ याच्या वतीने दहिहंडीचे आयोजन केले आहे. या दहिहंडी दरम्यान गोविंद पथकाना दहा लाख रुपयांची बक्षीसे वाटप करण्यात येणार आहे. मात्र या बक्षीसामधील पन्नास हजार ते एक लाख रुपये महापालिका हद्दीतील खड्डे भरण्यासाठी देण्याची अनोखी घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष कुणाल पाटील यांनी केली आहे.

कोरोना काळात दोन वर्षे दहिहंडी साजरी करण्यात आली नाही. यंदा उत्साहात दहिहंडी साजरी केली जात आहे. दहिहंडी नंतर गणेशोत्सव आहे. मात्र खड्डे भरलेले गेलेले नाही. रस्त्यावरील खड्डयामुळे नागरीक आणि वाहन चालक त्रस्त आहेत. खड्डयांचे विघ्न नको म्हणून महापालिकेस खड्डे भरण्यासाठी ही मदत करणार आहोत असे कुणाल पाटील यांनी सांगितले.

दहिहंडी उत्सवादरम्यान एका मंडळाची अनोखी घोषणा; रस्त्यावरील खड्डयांचे विघ्न नको म्हणून केडीएमसीला करणार आर्थिक मदत
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दहीहंडीला खेळाचा दर्जा, सरकारी नोकरीतही आरक्षण
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com